चांगली कल्पना आहे. अंक काढावा.
१. त्यातील लेखन हे एखाद्या विषयाला वाहिलेले असावे. उदा. सासू-सून विशेषांक मध्ये चार दिवस सासूचेबाबतची चर्चा, सुनेने सासवांवर केलेली कविता. या स्वरुपाचे लेखन.
२. मृदू प्रत मनोगत डॉट कॉम वर मिळेलच. शक्य असतील तर कठीण प्रती काढून यष्टीस्थानकांवर विकायला ठेवू. यानिमित्ताने असे संकेतस्थळ आहे याची माहिती मराठी वाचन करणाऱ्या जनतेला होईल.
३. पीडीएफ स्वरुपात उतरवून घेता येईल अशी प्रत उपलब्ध होईल तर चांगले. म्हणजे विरोपांमधून पाठवता येईल व ज्यांना संगणकावर वाचायला त्रास होतो- फारसे आनंददायी वाटत नाही त्यांना कार्यालयातील प्रिंटरवर प्रिंट घेऊन घरी वाचता येईल.