ह्या दिवाळी अंकासाठी लेखन पुढीलप्रमाणे असू शकते---

१. मनोगतावर पूर्वप्रकाशित झालेले वेचक आणि वेधक असे गद्य, पद्य लेखन
    ह्यासाठी सदस्यांनी त्यांना आवडलेले इतरांचे लेख, कविता, कथा आदी साहित्य सुचवावे. त्यातून दर्जेदार असे लेखन निवडण्यात यावे. अशाप्रकारे  सदस्यांना अंकाच्या जडणघडणीत सहभागीही होता  येईल.

२. मनोगतावरील प्रतिभावंतांकडून आजवर प्रकाशित न झालेले साहित्य मागवून त्यातून निवडलेले लेखन
    मनोगतींनी ह्या दिवाळी अंकासाठी लेख, कविता, कथा आदी साहित्य पाठवावे. त्यातून दर्जेदार असे लेखन निवडण्यात यावे.

३. मनोगताबाहेरील प्रतिभावंताकडून मागवलेले साहित्य

अर्थात ह्या सर्व गोष्टींसाठी  संपादक मंडळ हे हवेच. साहित्य निवडण्यापासून प्रूफरीडिंग करण्यापर्यंत सर्व जबाबदाऱ्या ह्या मंडळाच्या. तसेच मनोगताचा दिवाळी अंक म्हटला म्हणजे लेखनाच्या दर्जाएवढेच शुद्धलेखनही महत्त्वाचे आहे.