दिवाळी अंक मनोगताचा आहे की नाही हा मुद्दा शुद्धलेखनाच्या बाबतीत दुय्यम समजायला हवा. जगात कुठेही दर्जेदार मराठी लेखन होत असेल तेथे सगळीकडे शुद्धलेखन सांभाळणे महत्त्वाचे आहे, असेच आम्हाला वाटते.

दुमत नाही. मनोगती शुद्धलेखनाच्या बाबतीत जागरूक असतात, चौकस असतात. त्यामुळे शुद्धलेखनाकडे विशेष लक्ष द्यायला हवे. 

व्यग्रावस्थेत (ऑनलाइन असताना घाईघाईत) केलेल्या लेखनात शुद्धलेखनाच्या आणि इतरही अनेक चुका राहातात.  तिथे लेखक आणि संपादनाची भूमिका आपणच बजावत असतो. पण संपादनसंस्कार झालेल्या लेखनात अशा चुका मुळीच व्हायला नको.

मुद्रितशोधन किंवा प्रूफरीडिंग करण्यासाठी थोडा व्यासंगही लागतो. अन्यथा 'देहांत'चा 'देहान्त' होतो आणि कवितेचा गंध नसला तर 'अता' चा 'आता' आणि 'अम्ही'चा 'आम्ही. '