मनोगतकार आणि मनोगताचे प्रशासन यांची दिवाळी अंक काढायचा की नाही याकरता कमीतकमी अनुमती तरी आवश्यक आहे असे वाटते.  कारण संकेतस्थळ त्यांचे आहे.   सदस्यांनी आपला वेळ देऊन अंकासाठी सर्व प्रयत्न करायचे आणि प्रशासनाला वेळेअभावी त्याची जोडणी  सुद्धा करत आली नाही तर दिवाळी अंक एकत्रित स्वरूपात अथवा पीडिएफ मध्ये संकेतस्थळावर वाचता येणार नाही याची जाणीव सर्व सदस्यांनी असू द्यावी. मनोगताचा दिवाळी अंक एखाद्या ब्लॉगवर वाचण्यात काय अर्थ आहे?

हा चर्चा विषय मनोगतींकडून प्रकाशित झाला ही आनंदाची गोष्ट आहे पण मनोगताच्या प्रशासनाने अंक प्रकाशित करावा अथवा करू नये यावर निर्णय घ्यावा असे वाटते. आणि नकार असेल तर लगेच कळवावे निदान ही चर्चा थांबेल आणि या चर्चेमुळे मनोगताच्या साठवणुकीचा अपव्यय होणार नाही..(पडद्यामागे अंक निघावा /निघू नये म्हणून व्य. नि ने  संकेतस्थळाच्या तांत्रिक बाबीत ताण निर्माण होण्याची/ वाढण्याची शक्यताही ताबडतोब नाहिशी होईल:)०

मनोगताचा दिवाळी अंक नको असे म्हणणारे मनोगती असतील असे वाटत नाही त्यामुळे मनोगताविषयी इतर सदस्यांप्रमाणे वाटणाऱ्या आपुलकीमुळे आणि दिवाळी अंक असावा असे वाटते म्हणून काही मुद्दे मांडते आहे. पुढे मागे शोधा मध्ये निदान हे मुद्दे सापडतील..

दिवाळी अंकासाठी सर्व प्रकारची मदत करण्याची माझी तयारी आहे. साहित्याची निवड कशी करायची/कोणते सदस्य/ अथवा  सर्व प्रवेशिकांचा समावेश करायचा त्यावर चर्चा व्हावी.

मनोगत विशेष म्हणून आजवरचे निवडक साहित्य अंकात घेणे हा मला सर्वात सोपा पण शेवटचा पर्याय वाटतो.