जरा उशीरा चर्चा पाहीली तरीही माहीती असलेली सांगतो:

"सप्त" चिरंजीव ह्या सात चिरंतन वृत्ती दाखवतात हे वर "अनुंनी" म्हंटल्याप्रमाणेच दाजी शास्त्री पणशीकरांनी त्यांच्या "महाभारत एक सुडाचा प्रवास" या पुस्तकात चांगल्या पद्धतीने मांडले आहे. पुस्तक आत्ता नजरेसमोर नाही पण जसे आठवतो तसे काही शब्दांमधे लिहीतो:

मूळ श्लोक (व्याकरण चु.भू.द्या . घ्या. ) :

अश्वत्थामा बलीर्व्यासो हनुमानश्च बिभिषण:  कृप: परशूरामस्य सप्तैश्री चिरजीवन:

अश्वत्थामा - आत्यंतीक कृरतेचे प्रतीक

बली - आत्यंतीक दानशूरपणाचे प्रतीक ("के प्राण जाये..")

व्यास - आत्यंतीक विद्वत्तेचे प्रतीक

हनुमान - आत्यंतीक निष्ठेचे (दास्यत्व - पण नोकर या अर्थाने नव्हे) प्रतीक

बिभिषण - कृतघ्नतेचे प्रतीक (वेळ आली तेंव्हा स्वतःच्या माणसांना सोडले त्या उलट कुंभकर्णाने त्याला उठवल्यावर रावणाला "झापत" विचारले की नसते उद्योग करायला आणि न पेलवणारे युद्ध चालू करायला कोणी सांगीतले होते, तेंव्हा का उठवले नाही? पण आता वेळ टळली आहे, मला माझा अंत माहीती आहे पण मी माझ्याच माणसांच्या म्हणजे तुझ्या बाजूने लढून मरण पत्करीन..)

कृप - दारीद्र्य आणि नोकरी यातून आलेली लाचारी (मला हे नीटसे आठवत नाही पण असाच काहीसा संदर्भ आहे)

परशूराम - परत कृरकर्मा पण आत्यंतीक सूडाचे प्रतीक.

आता विचार करा की आपापल्या आयुष्यात यातील किती वृत्ती आपण जवळून अथवा वाचून / पाहून (किंवा स्वत: मध्ये) पाहील्या आहेत ते !