मनोगताचा 'दिवाळी अंक' ही कल्पना सुंदर आहे.

एखाद्या विषयावरील स्पर्धात्मक लेखन हे लेखकांसाठी/कवींसाठी स्वागतार्ह आव्हान असेल. त्याच बरोबर निर्धारित विषयाबाहेरील लेख/कविता सुद्धा स्वीकाराव्यात.

अंकाचा आकार ठरविल्यावर लेखांची/कवितांची निवड करून अंक प्रसिद्ध करावा. दिवाळी अंकात ज्याचा समावेश होऊ शकला नाही ते लेखन मनोगतावर प्रसिद्ध करावे.

जुने लेखन पुन: प्रकाशीत करू नये. ताजे लेखन विचारात घ्यावे.