दिवाळी अंकाची कल्पना आवडली. चांगल्या कल्पनेस खो घालण्यासाठी म्हणून नव्हे तर 'डेविल्स् ऍडवोकेट'च्या भूमिकेतून मनात आलेले काही प्रश्न मांडत आहे. (तेही स्वत:च्या नावाने!)
१)
    सदस्यांनी त्यांना आवडलेले इतरांचे लेख, कविता, कथा आदी साहित्य सुचवावे.

इथे बहुतेक लिहिते सदस्य अनेक नावांनी लिहितात. एका नावाने लिहिलेले साहित्य काही मंडळी आपल्याच दुसऱ्या idने सुचवणार नाहीत कशावरून?  IP ऍड्रेसचे म्हणाल तर Anonymizer संकेतस्थळे, Tor व इतर अनेक मार्ग अशा कामासाठी उपलब्ध आहेत.

२)
    त्यातून दर्जेदार असे लेखन निवडण्यात यावे.
    ह्या सर्व गोष्टींसाठी  संपादक मंडळ हे हवेच.

लेखन कोण निवडणार? संपादक मंडळ. पण संपादक मंडळ कोण निवडणार? की ते नेमणूक पद्धतीने घटित केले जाणार? मंडळाचे सदस्य कोण कोण आहेत हे जाहीर केले जाणार की गुलदस्त्यात असणार? विचारण्यास कारण हे की पावणे-तीन वर्षे मनोगतचा सदस्य असूनही मनोगतच्या संपादक मंडळात कोण आहे हे मला अद्याप ठाऊक नाही. अशीच अनावश्यक गुप्तता इथेही पाळली जाणार का?

३)
    मनोगतावरील/मनोगताबाहेरील प्रतिभावंताकडून मागवलेले साहित्य

प्रतिभावंत कोण यावर होणाऱ्या चर्चेचे (पक्षी: भांडणाचे) पडघम तुम्हालाही ऐकू येत आहेत का हो? ;)