मनातील साऱ्या मुद्द्यांचा सुवर्णमयींने व्यवस्थित आणि सविस्तर उहापोह केला आहे. मात्र त्यांचे शेवटचे दोन मुद्दे सकृतदर्शनी परस्परविरोधी वाटतात. जर जोडणी व्यतिरिक्त प्रशासनाचा समावेश/सहभाग ठेवायचा नसेल तर साहित्य सुपूर्त करण्याची पद्धत प्रशासनाने का ठरवावी? त्याऐवजी संपादक मंडळाने एक याहू वा जी-मेल आय-डी निर्माण करावी व इच्छुक लेखकांनी साहित्य तिथे पाठवावे. असे केल्याने मनोगताच्या साठवणुकीचा अपव्ययही होणार नाही. याहू/गूगलची काळजी आपण करायची गरज नाही, त्यांच्याकडे खूप जागा आहे साठवणुकीसाठी.

मनोगत विशेष म्हणून आजवरचे निवडक साहित्य अंकात घेणे हा मला सर्वात सोपा पण शेवटचा पर्याय वाटतो.

उलट मला असे वाटते की मनोगतावरील आतापर्यंतचे सर्वोत्तम साहित्य या अंकात घेतले तर मनोगतच्या आजवरच्या वाटचालीचा तो एक जतन करण्यायोग्य ठेवा होईल.