लेखन कोण निवडणार? संपादक मंडळ. पण संपादक मंडळ कोण निवडणार? की ते नेमणूक पद्धतीने घटित केले जाणार? मंडळाचे सदस्य कोण कोण आहेत हे जाहीर केले जाणार की गुलदस्त्यात असणार?

संपादक मंडळ कोणी निवडू नये. जे वेळ देऊ शकतात, ज्यांच्या केलेल्या निवडीवर वाचक आक्षेप घेण्याची शक्यता त्यातल्या त्यात कमी आहे,  अशा सदस्यांनी स्वतः पुढाकार घ्यावा.  आणि संपादक मंडळ नक्कीच जाहीर करण्यात यावे.   त्यानंतरच पुढच्या गोष्टी. पण हे असे संपादक मंडळ 'घटित' करायचे म्हणजे मनोगतावरील 'प्रतिभावंतां'ची  नाराजी ओढावून घेणे आलेच :) त्याची तयारी ह्या संपादक मंडळींची असावी.  शेवटी ध्येय वाचकांना दर्जेदार अंक देणे हेच असावे.

प्रतिभावंत कोण यावर होणाऱ्या चर्चेचे (पक्षी: भांडणाचे) पडघम तुम्हालाही ऐकू येत आहेत का हो? ;)
आपण प्रतिभावंत आहोत असे प्रत्येक लेखकालाच वाटत असते. ते योग्यच आहे. पण
प्रतिभावंत कोण हे इतरांवर म्हणजे रसिकांवर, वाचकांवर सोडायला हवे, असे मला वाटते. :)

वरील मुद्द्यांवर खूप चर्चा होऊ नये असे मला वाटते. कारण ह्या चर्चा न संपणाऱ्या आहेत. एकंदरच चर्चा लवकरात लवकर संपवून कामाला लागावे, असे मला वाटते.