दोन अंक काढता येतील.
१. सर्वोत्तम मनोगत -- ह्यात आत्तापर्यंत मनोगतावर प्रकाशित झालेले वेचक, वेधक साहित्य प्रकाशित व्हावे.
२. मनोगत विशेष -- ह्यात मनोगतावरील, मनोगताबाहेरील प्रतिभावंतांचे निवडक अप्रकाशित साहित्य असावे.
सुवर्णमयी ह्यांनी खोलात शिरून चांगले मुद्दे मांडले आहेत. ह्या अंकांत ललित निबंध,वैचारिक निबंध,कथा, कविता,मुलाखती, प्रवासवर्णने, अनुभव आणि पाककृती अशा प्रकारचे साहित्य असावे.
ह्याबाबत दिवाळी अंकाशी निगडीत संपादकांशी काल बोलणे झाले. त्यावरून मला वाटते की पहिल्या अंकात किमान ५ कथा, १० पाककृती, १० वैचारिक लेख, १० ललित निबंध, ५ प्रवासवर्णने, ५ अनुभव, २० कविता असाव्यात.
दुसऱ्या अंक त्यामानाने कृश असावा. सुवर्णमयींनी दिलेली संख्या चांगली सुरुवात.