मनोगतकार आणि मनोगताचे प्रशासन यांची दिवाळी अंक काढायचा की नाही याकरता
कमीतकमी अनुमती तरी आवश्यक आहे असे वाटते. कारण संकेतस्थळ त्यांचे आहे.
सदस्यांनी आपला वेळ देऊन अंकासाठी सर्व प्रयत्न करायचे आणि प्रशासनाला
वेळेअभावी त्याची जोडणी सुद्धा करत आली नाही तर दिवाळी अंक एकत्रित
स्वरूपात अथवा पीडिएफ मध्ये संकेतस्थळावर वाचता येणार नाही याची जाणीव
सर्व सदस्यांनी असू द्यावी.
चांगला मुद्दा आहे. त्यांनी त्यांचे मत इथे मांडल्यास उत्तम. पण त्यांची अनुमती आहे असे समजून पुढे जाऊ या:)
पीडीएफ फाइल बनविणे किंवा एचटीएमल स्वरुपात अंक तयार करणे प्रशासनाचे काम नाही. ते आपणच करायला हवे. कथा, कवितांशी सुसंगत अशी रेखाचित्रे, चित्रे, छायाचित्रे सजावटीत हवीत. पण कटाक्ष फायलीचा आकार छोटा ठेवण्यावर असावा. सजावट कमीतकमी (मिनिमलिस्टिक ह्या अर्थाने) पण देखणी असावी.
'ड्रुपल बुक' म्हणून दिवाळी अंक देता येईल. पण सजावटीतल्या अडचणी तपासून बघाव्या लागतील. ह्याबाबतही प्रशासनाने आपले मत मांडल्यास चांगले.
ऑगस्ट अखेर ही साहित्य सुपूर्त करण्याची अखेरची तारीख आणि बलिप्रतिपदा (पाडवा)ही अंक प्रकाशित करण्याची तारीख होऊ शकेल.
हो असेच काहीसे मनात आले होते.