मनुस्मृती मनु ने लिहीली. त्यात त्याने अस्पृश्यता निर्माण केली. अस्पृश्यांना हीन दर्जाची वागणूक देण्याचे ठरवले. सोबतच स्त्रीयांना सुद्धा अस्पृश्यांसमान वागणूक देण्याचे ठरविले. हे सर्व त्याने करायला सांगीतले.

असे नव्हते की त्या आधी समाज प्रगत नव्हता. आधीचा समाज सुद्धा प्रगत होताच. एकाच प्रभुची लेकरे सारी म्हणनारा समाज ह्या मनुच्या मागे गेल्याने रसातळाला गेला. त्यामुळे मनुला दोष दिला जातोय.

आज मनु हा एका विशिष्ट मानसिकतेचा नायक आहे. त्या मानसिकतेवर वार करायचा झाल्यास त्याचा उल्लेख मनु असा केला जातो.

दुर्दैवाने आजही मनुला आपला नायक माननारी लोक भारतात आहेत. कुठल्याही कारनाने का होईना त्याचं समर्थन केलं जातं. हे दु:खद आहे.

नीलकांत