एका अंकाचे दिवाळीशी नाते ठेवावे. दुसरा अंक 'सर्वोत्तम मनोगत'. यात कोणते साहित्य असावे याबाबत संपादक मंडळाने निणय घ्यावा किंवा चक्क मतदान घ्यावे. प्रत्येक प्रकारासाठी एकएक चर्चाप्रस्ताव टाकून प्रस्ताव टाकणाऱ्याने मिळालेल्या प्रतिसादांचे विश्लेषण करुन त्या प्रकारातल्या लिखाणाची निवड करावी. अशा प्रस्तावांना किती प्रतिसाद मिळतो याची चाचपणी म्हणून मी ''मनोगत' वरील उत्कृष्ट कथा' असा एक प्रस्ताव टाकतो आहे.