असे नव्हते की त्या आधी समाज प्रगत नव्हता. आधीचा समाज सुद्धा प्रगत होताच.
मग हा (त्या वेळचा) प्रगत समाज मनूच्या वैचारिक प्रभावाखाली कसा आला? की स्वेच्छेने आला? स्वेच्छेने आला असेल तर त्या काळच्या समाजाला मनूचे विचार त्या काळी पटले असावेत. आता ते कालबाह्य झाले आहेत इतकेच.
मनूशी असलेली आपली नाळ तोडायची असेल तर आपण स्वतःला "मानव" "मनुष्य" "माणूस" म्हणवणे थांबवले पाहिजे. कारण हे सर्व शब्द "मनु" या शब्दापासून आलेले आहेत.