मीराताई,

तुमचे आणि तुमच्या चिरंजीवाचे हार्दिक अभिनंदन.

मुलाचा कौतुक सोहळा, तोही इतक्या दूर, जगाच्या पार दुसऱ्या टोकाला जाऊन, पाहायला मिळणं ह्याहून जीवनांत अधिक ते काय पाहिजे? मुलालाही, मुद्दाम इतक्या दूरून येऊन, आईने पाठीवर दिलेली शाबासकीची थाप, डॉक्टरेटच्या पदवीहूनही, थोर वाटली असणार. धन्य तो पुत्र आणि धन्य ती माता.