रिमिक्स, अनेक मालिका आणि आजकालच्या बऱ्याचशा जाहिराती, न पाहिल्यानेच आपण सुखी होऊ शकतो, ह्या विचारांप्रत मी येऊन ठेपलो आहे.
प्राजु ह्यांच्या विचारांशी अंशतः सहमत आहे परंतु प्रत्येक काळात (माझ्या वडीलांच्या, माझ्या आणि माझ्या मुलाच्या) बदल हे घडत गेले. मागच्या आणि पुढच्या पिढीत विचार भिन्नता नेहमीच होती आणि असणार आहे. तरूणांना जुन्या गोष्टीही आवडतात आणि नव्याही लुभावतात. तेंव्हा 'हे' घडणारंच. जे-जे आपल्याला रुचतं ते-ते स्वीकारावे बाकी सर्व दूर्लक्षावे.