गाण्यात/कवितेत स्वातंत्र्यप्राप्ती नंतरचे 'भयानक' आणि 'विदारक' सामाजिक चित्र चितारले आहे. त्यामुळे 'शहारे' हाच शब्द योग्य वाटतो.
'रोमांच' शब्दातून भावनिक सुखी अवस्थेचा भास प्रतीत होतो. जसे पहिला पाऊस, पहिला पगार, प्रेयसीचा/प्रियकराचा पहिला स्पर्श, पहिला विमान प्रवास......इत्यादी इत्यादी.