मोकळेपणाने वाचन आणि लेखन हे तर करायचेच आहे. मनोगत मुक्तांगणच आहे, कोणताही दिवाळी अंक मुक्तांगण कसा होईल? त्यामुळे तुमचा रोख निवडक साहित्यावर आहे असे समजते. कोणत्याही संकेतस्थळावर त्यावरील निवडक साहित्य प्रकाशित करणे म्हणजे मुक्तांगण संपले असे नाही. मायबोलीवर 'निवडक साहित्य' म्हणून एक विभाग आहे. जवळ जवळ दर महिन्यातील निवडक साहित्य त्यात असते. मायबोली करते म्हणून आपणही करायचे असे नाही तर त्याचा फायदा सिद्ध झाला आहे म्हणून तसे करायला हरकत नाही. नवीन सदस्यांना अथवा आपल्यालाच काही निवडक साहित्य चटकन सापडावे, पुन्हा पुन्हा वाचता यावे म्हणून अशी निवड केली तर काय वाईट आहे?माझ्यामते हा प्रयोग वर्षातून दोनदा करायला काहीच हरकत नाही.
निवड कोणी करायची, कशी करायची , अशी निवड करायला मदत करणार का? यावर काही मत असेल तर नक्की सांगा. त्यात आपले लेखन आले नाही याचे वाईट वाटू शकते पण सुदैवाने कोणाची रोजीरोटी यावर अवलंबून नाही त्यामुळे निदान प्रयत्न करायला काय हरकत आहे?
मनोगत म्हणजे मुक्तांगण नाही असा चुकीचा समज करून घेऊ नका.