चक्रपाणि,

प्रथम आपले अभिनंदन!!!

मला सुद्धा जून २००६ मध्ये अभियांत्रिकीची पदवी मिळाली; परंतु मी बंगलोरला आणि पदवीदान समारंभ पुण्याला... त्यामुळे काळा डगला, डोक्यावर चौकोनी टोपी आणि हातात पदवीचे भेंडोळे अशा अवतारातला फोटो काढून मिरवायची संधी कधी मिळते, अशी स्थिती माझी पण होती.

आमची ही हौस पुरवण्यासाठी म्हणून की काय, आमच्या कंपनीत प्रशिक्षणानंतर "ग्रॅज्युएशन डे" आयोजीत केला होता. त्यावेळी काळा डगला, डोक्यावर ती चौकोनी टोपी आणि हातात प्रमाणपत्र घेऊन मिरवण्यात फारच अभिमान वाटत होता.

आपल्या या लेखामुळे त्या आठवणींना उजाळा मिळाला :-)