लालुताई,

बर्‍याच दिवसानी इथे लिहिले आपण.

ही बांगडा करी असल्यामुळे दुसरा मासा चालेल असे वाटत नाही.  नाहीतर या पाककृतीला **करी असे नाव दिले असते.

जरा हलक्यानेच घ्या (टेक इट लाईटली)

सुभाष

ता.क.

मॅकरेल या नावाने बांगडे कुठेहि मिळतील असे वाटते.  इथे अमेरिकेत ते पौर्वात्य दुकानांत (गोठवलेल्या स्थितीतले) नेहमी मिळतात.  काही ठिकाणी (उदा. ऍटलांटा, सॅन फ्रॅन, न्यूयॉर्क, ह्यूस्टन अशा) ताजे(?) पण मिळतात.  मला स्वतःला गोठवलेले अधिक पसंत आहेत.  ते बहुतेक वेळेला मच्छीमारी जहाजांवर पकडल्या पकडल्या, किंवा लगेच बंदरात बोट आल्याबरोबर गोठवले जातात त्यामुळे त्याची बिघडायची प्रक्रिया न झाल्याने ते अगदी ताज्याप्रमाणे लागतात.

पौर्वात्य दुकाने ही बहुधा चिनी असतात, पण फिलिपाईन्स आणि कोरियन पण असतात.  उवाजी माया या नावाच्या साखळीमध्ये फारच चांगली मासळी, सर्व ताज्या भाज्या, फळे  इत्यादि छान मिळते.  तिथे ओल्या भुईमुगाच्या शेंगा मिळाल्या की फारच मजा येते.

परत,
सुभाष