अंकासंबंधी महत्त्वाची माहिती/घोषणा
१. अनु
२. मिलिंद फणसे
३. श्रावण मोडक
४. संजोप राव
५. सुवर्णमयी
(वरील यादी अकारविल्हे आहे.)
आतापर्यंत ह्या सदस्यांनी संपादनकार्यात सहभागी होण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ज्यांना
ह्या अंकाच्या संपादनात (ह्यात मुद्रितशोधन, निवडानिवड, लेखकांकडून लिखाण
मागवणे, पाठपुरावा करणे इत्यादी गोष्टी आल्या) आणि निर्मितीत (ह्यात
सजावट, एचटीएमएलमधील पाने तयार करणे आले) सहभागी व्हावेसे वाटते त्यांनी
पुढे यावे. वेळ कमी आहे.
प्रत्येक
लेखनप्रकारासाठी (ह्यात मनोगतावरील जवळपास सर्व लेखनप्रकार आले) एक किंवा
दोन प्रभारी असतील. ते प्राथमिक चाळणी करतील. पण अंतिम निवड सर्व मिळून
करतील.
तसेच प्रशासकांनी निरोपातून सुचविल्याप्रमाणे दिवाळी अंकाचे
व्यवस्थापन, संपादन, निवड आदि करण्यासाठी गूगल ग्रुप्सवर दिवाळीमनोगत हा
समूह सुरू केला आहे. मनोगतापासून स्वतंत्र अशा स्वरूपाचे हे व्यवस्थापन
असेल. त्यातून निर्माण होणारा दिवाळी अंक सादर कसा करायचा हे नंतर
ठरवण्यात येईल.
अंकाच्या जडणघडणीत खालील दिवस/तारखा महत्त्वाच्या आहेत--
* १५ ऑगस्ट -- ह्या अंकांतील मजकूर १५ ऑगस्टपर्यंत यावा.
* १ ऑक्टोबर -- ह्या तारखेपर्यंत संपादनाचे काम संपायला हवे.
* १ नोव्हेंबर -- ह्या तारखेपर्यंत अंक तयार व्हायला हवा
* बलिप्रतिप्रदा -- ह्या दिवशी (पाडव्याला) अंक प्रकाशित होईल.
(पहिल्या दोन तारखांच्या बाबतीत थोडी लवचिकता गृहीत धरावी.)
सदस्यांना आपल्या सूचना, सुचवण्या, मते-मतांतरे, आवडी-निवडी diwalimanogat@googlegroups.com ह्या पत्त्यावर कळवाव्यात, पाठवाव्यात.