वरील मजकूर वाचून उस्ताद झाकिर हुसैन हे खरे मराठी मुंबईकर आहेत हे सिद्ध होते. त्यांच्याच शहरात नुकतेच पावसाने थैमान घातले.
त्याबाबत हे देखील वाचा. हे देखील वाचावे.
"मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय म्हणवणाऱ्या शहरात थोडा जास्त पाऊस झाला आणि चार
मराठी मुडदे वाहिले म्हणून काय झालं. आता मराठी बाण्याचा भगवा झेंडा अटकेपार नाही
तर जगाच्या कानाकोपऱ्यात फडकणार आहे. कारण मायबाप सरकारनं कन्वेंशनं भरविण्यासाठी
लाखोंचा रमणा देऊन आम्हांला उपकृत केलंय. आम्ही अमेरिकावासी आतापर्यंत देण्याच्याच
गोष्टी करतं होतो. र्वल्ड बॅंकेनं नुकतीच शेकडो कोटींची मदत भारताला दिलीयं. तो
आनंद आम्ही अजूनही साजरा करतोयं. पण विलासराव तुमच्या या कृती आमचे डोळे उघडले आहे.
तुमच्या दातृत्वासमोर आम्ही गरीब ठरलो आहोत. पण , विलासराव त्यामुळं
तुम्ही श्रीमंत ठरत नाही. "
ह्या अमेरिकन मराठी सोहळ्याला महाराष्ट्र शासनाने आर्थिक मदत केली. आणि बीएमएमने ती घेतली:) ह्याबाबत काय वाटते.