द्वारकानाथ महोशय,
याची गोष्ट वेगळीच आहे ती अशी ---
बाजारात तुरीची प्रसिद्ध गोष्ट आहे त्यावरून ही म्हण निघाली :-
एक ब्राह्मण बाहेर निघाला होता. ब्राह्मणीने त्याला येताना बाजारातून तुरीची डाळ आणायला सांगितली.
तो : वा तुरीची डाळ आणतो. घरी आल्यावर डाळ शिजवून वांगी घालून वरण कर. खूप दिवसात केले नाहीस.
ती : छे छे मी आमसुलं घालून आमटी करणार. त्यांत कांदे घालणार आहे.
तो : अग वा ग. मी सांगितलेले तू काहीच करीत नाहीस. मला कित्येक दिवसानी वांग्याचे वरण मिळणार म्हणून मी खूष होतो आणि तू आपलंच तुणतुणं वाजवतेस? काही नाही वांगीच घातली पाहिजेत वरणांत.
ती : आले मोठे मला सांगायला कि वांगी घाल म्हणून. मुळीच नाही. मी कांदे घालूनच आमटी करणार आहे.
तो : उगीच बडबड करू नकोस. वांगी घालून काय चव येते वरणाला. माझ्या आईच्या सारखी कर मात्र.
ती : डोंबल माझं. काही चव तरी होती का सासूबाईंच्या स्वयपाकाला! काहीतरी खूळ घेऊन बसता तुम्ही. मी मुळीच म्हणजे मुळीच वांगी घालणार नाही.
तो : तुझ्या माहेरच्या स्वयपाकाचे काय दिवे लागले होते ते माहीत आहे मला.
ती : माझ्या माहेराला नावं ठेवलेली मला खपायची नाहीत. देवा देवा!! काय पाप केलं आणि या दळभद्री घरांत येऊन पडले.
तो : मी दळभद्री काय ग **चे......
असे म्हणून भट भटणीला मारू लागला.
म्हणूनच-----------------
बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी !!!!!!