१. पाठवल्या जाणाऱ्या गद्य प्रकाराची लांबी(शब्द मोजणीत धरुन,रिकाम्या ओळी मोजून नव्हे) किमान संगणकपडद्याची (स्क्रॉल न करता)उंची पूर्ण भरेल इतकी तरी, आणि कमाल (वाचकांच्या सहनशक्तीचा विचार करुन) कितीही असावी.
२. लिखाण पाठवताना त्याची सॉफ्ट/हार्ड प्रत स्वतःजवळही ठेवावी.
३. लिखाणात खूप जास्त प्रमाणात '....' ,'!!' ,'इमोटीकॉन्स/भावमुद्रा, उदा , D:) इ.' टाकणे शक्यतो टाळावे. 
४. लिखाण पाठवताना शक्यतो एकाच भागात पूर्ण पाठवावे. वेळेची अडचण असल्यास मनोगतावरील अप्रकाशित लेखनाचा पर्याय वापरुन रोज थोडे थोडे लिखाण करुन पूर्ण झाल्यावर एकदम पाठवल्यास उत्तम.