वाचता वाचता चेहऱ्यावर हसू उमटत होते आणि माझे वाहन परवाना काढायचे, रस्ता चुकायचे क्षण आठवत होते.

मी बाह्य वळण चुकले की पुढचे वळण घेवून मागे परत येत असे, आणि दर वेळी बाहेर पडतांना पथभाराचा भुर्दंड भरावा लागत असे.

विमा काढतांना मात्र भारतीय वाहन परवाना पद्धतीचा फायदा झाला, १६व्या वर्षी लुनाचा परवाना काढलेला, नंतर १८व्या वर्षी फटफटीचा आणि मग बऱ्याच वर्षांनी चार चाकीचा, दरवेळी नवा परवाना काढतांना जुन्याच परवान्याच्या कागदावर वाहन निरिक्षकालय नवा शिक्का मारीत असे. त्यामुळे इकडल्या विमा कंपनीचा, माझा चारचाकी वाहन चालवण्याचा अनुभव पुष्कळ वर्षांचा आहे, असा ग्रह झाला आणि मला विम्याचा मासिक हप्ता कमी द्यावा लागला.