स्वयंसुधारणा निकामी करण्याची सोय ठेवावी अशी विनंती मी करणार होतेच पण त्यापूर्वीच ही सोय उपलब्ध झाली त्याबद्दल धन्यवाद! विशेषतः देहान्त, सप्ताहान्त अशा ठिकाणी, किंवा आपल्याला जेव्हा एखादी चूकच दाखवून द्यायची असते तेव्हा स्वयंसुधारणा जरा अडचणीची वाटते.

शिवाय माझे व्यक्तिगत मत असे की चूक आपोआप दुरुस्त होत असल्याने आपली चूक झाली होती हेही लिहिणाऱ्यास कळत नाही. त्यामुळे शुद्धलेखन सुधारण्याच्या दृष्टीने त्याच्याकडून  प्रयत्न केले जात नाहीत. त्याचा परिणाम असा की कागदावर लेखणीने लेखन करताना शुचिच्या अभावी ते लेखन अशुद्धच राहते.