देवनागरी भाषेसाठी उपलब्ध झालेली ही आपल्या प्रकारची पहिलीच स्वयंसुधारणा सुविधा असावी. गेल्या जवळपास दीड वर्षापासून ह्या सोयीत अनेक चांगले बदल झालेले दिसताहेत. सुरुवात अतिशय उत्तम झाली आहे.  अभिनंदन!

काही किरकोळ मुद्दे

१. ही स्वयंसुधारणेची केवळ मनोगताचा अक्षरश: (फोनेटिक) कळफलक (कीबोर्ड) वापरतानाच उपलब्ध होते. विंडोज एक्सपीचा इनस्क्रिप्ट हा कळफलक वापरताना ही सोय उपलब्ध होऊ शकणार नाही. त्यामुळे मनोगताच्या लेखनसुविधेत चारपाच कळफलक पर्याय असल्यास उत्तम. अर्थात हे सध्यातरी एव्हढे महत्त्वाचे नाही.

२. दिर्घ, स्विकार, किति, तूझा, तूमचा ह्या आणि ह्यासारख्या दोन-तीन अक्षरी शब्दांच्या लेखनातल्या चूका नेहमी होतात. त्या ह्या सोयीद्वारे भविष्यात हाताळल्या जातीलच असे वाटते.

३. अवतरण चिन्हांत काही वेळेस स्वयंसुधारणा काम करीत नाही. 'दीपावली', 'परीक्षा' हे चार आणि तीन अक्षरी नीट लिहिता आले. पण 'आणी' हा दोन अक्षरी शब्द नाही.