कथा चांगली उतरली आहे. शेवट अपूर्णही वाटला नाही, व्यवस्थित आहे, जेथे संपायला हवी तिथेच कथा संपते. प्रत्येक गोष्ट स्पष्ट करून सांगण्यापेक्षा वाचकांना शेवट निवडण्याची मुभा देणेच बरे वाटते.
अर्थात, एखाद्याला अपूर्ण वाटणेही शक्य आहे त्याकरता असे एक दोन अद्वैत मी समाजात खूप जवळून पाहिले आहेत. सायलीच्या बोलण्यावर थोडेसे शरमिंदे होऊन नंतर तिला कायमाचा डच्चू देऊन आपल्या नेहा समवेत "सुखी" आहेत. फक्त फरक एवढाच की यातील एका अद्वैताला नेहा भेटली तेव्हा सात वर्षांची मुलगी आणि तीन वर्षांचा मुलगा होता (म्हणजे बरा आठ नऊ वर्षांचा संसार झालेला होता.) दुसरा बराच प्रसिद्ध व्यक्ती असल्याने न बोलणे सोयिस्कर -- पहिल्याची गोष्ट अगदी आमच्या जवळपास घडलेली म्हणूनच वास्तविक वाटली.