प्रतिसादांबद्दल मनापासून आभार!
खरोखर, हुरूप वाढवणारे प्रतिसाद आहेत.
कथाबीज नेहमीचेच आहे, एवढंच नाही, तर अद्वैत-नेहा मधल्या घटनासुद्धा नेहमीच्याच आहेत हे मला अगदी पूर्णपणे मान्य आहे. कथेचा उद्देश 'एका पात्राच्या तोंडून माझे लग्नविषयक फंडे देणे' हा होता, आणि डोक्यात काही दुसरे आलेच नाही.
अनुताई, सुरूवातीचे तपशील अद्वैतच्या नेहाबद्दलच्या भावनांची तीव्रता दर्शवण्यासाठी गरजेचे आहेत असं मला वाटलं.
कथेचा शेवट अपूर्ण वाटू शकतो. कथा सुचली तेव्हा अद्वैत 'सुधरतो' असाच शेवट होता. पण लिहिताना दिसलं की फक्त कथेचा शेवट आलाय म्हणून अद्वैत एकदम बदलतो असं मी दाखवू शकत नाही. ते अद्वैतच्या व्यक्तिमत्वाशी सुसंगत होणार नाही. म्हणून 'किंकर्तव्यविमूढ' शब्दासोबत कथा संपवली.
परत एकदा, सर्वांचे मनापासून आभार!
पहिलीच पूर्ण कथा लिहिल्यावर त्या कथेवरचे प्रतिसाद माझ्यासाठी खरंच अनमोल आहेत. हौसला-अफजाही के लिये शुक्रिया!!!