ज्या मराठी वृत्तपत्राचे नावच असे अर्धवट आहे, त्या वृत्तपत्राकडून आणखी काय अपेक्षा ठेवावी बरे? अर्थात सर्वच प्रथितयश वृत्तपत्रांमध्ये मराठीचे वाभाडे काढण्याची चढाओढ चालू आहे असे वाटते.

एकेकाळी याच छापील माध्यमाने भारतीयांत स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतवले होते. हेच माध्यम मराठीचे वाटोळेही करू शकते असे वाटते. श्री. गोखले यांच्याप्रमाणे सर्व जागरूक वाचक अशा मराठी वृत्तपत्रांच्या संपादकांना नियमित पत्रे पाठवू शकतात.