बशीने गेलो असे म्हणणारी माणसे मी पाहिलेली आहेत. बशी हा शब्द आधीपासूनच मराठीत असल्याने बशीने असे म्हणायला नकोसे वाटत असावे. कोणी म्हणत असेल तरी ते चुकीचे वाटायला नको.

ह्याबद्दल दुमत नाही. असे म्हणणारे पाहिले असल्यामुळे आणि ते योग्य आहे हे माहीत असल्यामुळेच पेच.

बस हा शब्द नस प्रमाणे चालवून 'बसेने गेलो.' 'बसा थांबत नाहीत' असेही म्हणून पाहता आले असते.

नक्कीच. नस हा शब्द डोक्यात आला नाही. मग नस ह्या शब्दाचे अनेकवचन 'नशी' का करत नाही, याचे उत्तर मिळायला हवे.