फार चांगला आणि परखड लेख आहे. शेवटी ह्या पुरवण्या, ही स्तंभलेखने आमचीचे प्रतिबिंबे आहेत. आम्हाला नवे काही आवडत नाही. जुने तेच नव्या प्याकेजखाली विकले जाते, खपते. ह्या अवस्थेला ह्या अवस्थेला संपादकही जबाबदार आहेत. चांगला संपादक गुणवत्ता, प्रतिभा हेरून तिला प्रोत्साहन देतो, लेखनासाठी उद्युक्त करतो. पण असे होताना दिसत नाही. लेखक चांगले लिहितो ह्यापेक्षा त्याचे नेटवर्किंग किती चांगले हे महत्त्वाचे झाले आहे. आणि हाजीर तो वजीर.
तसेच ह्या संपादकांचा व्यासंग हा आव असतो. त्यांची मते, विधाने अतिशय जनरलाइज़्ड (मराठी शब्द हवा) आणि क्लीशेड (मराठी शब्द हवा) असतात. मध्यंतरी एका मोठ्या व्यासंगी संपादकाला भेटण्याचा योग आला. तेव्हा गझलेवर चर्चा झाली. बोलता-बोलता 'मराठीपेक्षा उर्दू किती गोड आहे,' तसेच 'उर्दू २००-३०० वर्षं जुनी भाषा आहे,' वगैरे वगैर पूर्वग्रहदूषित आणि अज्ञानमूलक विधाने कानावर आदळली. मराठीपेक्षा उर्दू गोड आहे असे म्हणणाऱ्या मराठी वृत्तपत्रांच्या सुमार संपादकाकडून काय अपेक्षा ठेवावी? ह्या असल्या संपादकांना मी कुठल्या टीव्हीवर काय बोललो, माझ्या विधानांमुळे कुठे कसा राडा झाला ह्यावर चर्चा करण्यातच जास्त रूची असते. असो.
शिवाय मराठी माणसाची वडा-पाव मानसिकताही ह्या गोष्टीला कारणीभूत आहे. ट्रफल(मराठीत काय म्हणतात) दिले तरी आम्ही ते पावात घालून खाऊ. गजानन भास्कर मेहेंदळे ह्या इतिहासकारांनी शिवाजी महाराजांवर जबरदस्त काम केले आहे. पण शिवाजी महाराज म्हटले की डोळ्यासमोर पुरंदरे, बेडेकर का येतात. कारण आम्हाला आवडेल असे जे लिहितात, बोलतात ते आम्हाला आवडतात. आम्हाला आश्चर्याचे आघात नको असतात. म्हणून गाणी तीच असतात, गायक बदलतात. तेच ते. मेंदीच्या पानावर मन अजून का झुलतंय गं.
तूर्तास एवढेच.
चित्तरंजन