चंद्राला दिवसा प्रकाश नसणे, ये कामिनीला जरा ।पद्मावीण तळे, निरक्षर मुखी जो साजिरा गोजिरा ॥दात्याला धनलोभ, नित्य वसते दारिद्र्य विद्वत्जनी ।दुष्टांचा पगडा महीपतिगृही ही सात शल्ये मनी ॥
--वामनपंडित