श्री. लालू,
दुसरा कुठलाही मासा वापरला तरी चालेल. (उदा. पापलेट, सुरमई, कोलंबी इ.) परंतु, तिरफळे फक्त बांगड्या साठीच वापरतात. ती तेवढी इतर माशांच्या कालवणातून वगळावी.
श्री. भाष,
वरील पाककृती 'बांगड्याची'च आहे. त्याला कारण त्यांत वापरलेली 'तिरफळे'. तिरफळे वगळून हिच पाककृती इतर माशांसाठी वापरता येईल. त्याला 'माशाचे कालवण' असे म्हणावे.
माशाच्या कालवणातही मालवणी, सारस्वत, गोवन, सी.के.पी., बंगाली, मलबारी, तामीळ असे विविध प्रकार आहेत. सावकाशीने आपण त्या - त्या पाककृतींचा आस्वाद 'मनोगता'वर घेणार आहोतच.
मॅकरेल या नावाने बांगडे कुठेहि मिळतील असे वाटते. इथे अमेरिकेत ते पौर्वात्य दुकानांत (गोठवलेल्या स्थितीतले) नेहमी मिळतात. काही ठिकाणी (उदा. ऍटलांटा, सॅन फ्रॅन, न्यूयॉर्क, ह्यूस्टन अशा) ताजे(?) पण मिळतात. मला स्वतःला गोठवलेले अधिक पसंत आहेत.
मासे ताजेच चांगले. पण ताजे मिळत नसतील तर गोठवलेले खाण्यास हरकत नाही. परंतु विकत घेताना त्यावरील गोठविल्याची तारीख बघून घ्यावेत. त्याच महिन्यातील तारीख असेल तर हरकत नाही. फार जूने घेऊ नयेत. मॅकरल (कींवा बांगडे) तसेच प्रॉन्स (किवा कोलंबी) लवकर ख्रराब/दूषीत होतात. त्यामुळे तारीख पाहून घ्यावी.
धन्यवाद.