सप्तर्षी - एप्रिल महिन्यात आकाशात उत्तर दिशेला कांहीसा उजवीकडे जो तारकासमूह दिस्तो त्यास सप्तर्षी म्हणतात.
त्या तारका मरिची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, पुलह, ऋतु, व वसिष्ठ या ऋषींच्या नावाने ओळखल्या जातात.

विवाहाचे कार्यात पुण्याहवाचनाहचे वेळी मातृकापूजन केले जाते. त्या ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराहि, इंद्राणि
आणि चामुंडा अशा सात मातृका गौरी होत.

विक्रमादित्याने इ‌‌. स. पूर्व ५७ साली दिल्लीला जो ध्वजस्तंभ उभा केला तो नंतर कुतुबमीनार या नावाने ओळखला गेला,
हाही सात मजलीच आहे.

' वेडात दौडले वीर मराठे सात ' हे काव्य सर्वांच्या परिचयाचे आहेच

स्नान करतांना जो श्लोक म्हटला जातो त्यात सप्तनद्यांचा उल्लेख आहे.
गंगेच, यमुने चैव गोदावरी, सरस्वती ।
नर्मदे, सिंधु, कावेरी जलेस्मिन् संन्निधी कुरु ॥

गयत्री मंत्रात भू:, भुव:, स्व:, मह:, जन:, तप: आणि सत्यम् या सप्त व्याहृतींचेच आवाहन केले जाते.