खरं तर अनेक नामांकित विद्यापीठातून दरवर्षी अनेक विद्यार्थी पदव्या, अगदी डॉक्टरेट सुद्धा घेतात. माझा मुलगाही त्यातलाच एक. तरीही आईला मुलाच्या पदवीचं विशेष वाटतंच! त्यानुसार काही तासांनंतर भव्य सभागृहात, प्रशस्त व्यासपीठावर पदवी घेताना मुलाला पाहिलं आणि अभिमान आणि आनंद वाटला पण जास्त आनंद तर लेकाचं कौतुक त्याच्या मार्गदर्शकाच्या तोंडून ऐकताना झाला होता.
ही वाक्ये वाचून खूप आनंद झाला. आपले आणि मुलाचे अभिनंदन .