लेख आवडला. शेवटचे दोन परिच्छेद अधिक आवडले. मराठी संकेतस्थळे, अनुदिन्यांबद्दल लिहिलेले आवडले.
परदेशातली मंडळी आणि युवा पिढीचे माहितीजालपडीक हे या प्रथितयश स्तंभलेखकांना आणि इतरच दैनिकातील मराठीपुरवण्यांच्या उदोउदोला कारणीभूत आहे यात शंका नाही.
अगदी.
शेवटी राजकारण्यांपुढे मिंधेपणा घेणे हे आमच्या रक्तातच आहे आणि आपल्या कृतीचे समर्थन करणारे तरबेज राजकारणीही आम्हाला लाभले आहेत.
सहमत.
जाळ्यावरील लेखनाकडे मराठीची तळमळ, दर्जेदार साहित्याची निवड आणि उद्याचे संदर्भ म्हणून जर बघण्याचा विचार आहे तर खरच आपल्याला यातील लेखनातून काय हव आहे त्याच सिंहावलोकन प्रत्येकाने करायला हव.
सहमत.
मनोगतासारखी मराठी संकेतस्थळे, अनुदिन्या या मराठी भाषेच्या प्रेमातून आकारास येतात. तरूण पिढीचा अधिकाधिक समावेश असणारे, जाणतेपणाची झलक देणारे, विविध विषयांवरचे लेखन इथे अधिक दिसते का ?
या विषयावर वेगळी चर्चाच टाकावी लागेल. इतरांच्या नजरेतून हा मुद्दा सुटला की त्यांना महत्त्वाचा वाटला नाही तेच जाणोत. प्रशासनाला याची दखल घ्यायला काही हरकत नसावी.
वाचकांची आवडनिवड जालावर होणाऱ्या लेखनातून समजायला वेळ लागत नाही, म्हणूनच काय लिहायचे आणि कसा प्रतिसाद द्यायचा त्याची निवड प्रत्येकाने विचारपूर्वक करायला नको का?
हवा की पण बहुधा कळतं पण वळत नाही त्यातली गत असावी.
खालावणारे स्तंभलेखन आणि पाट्या टाकल्यागत भरली जाणारी संकेतस्थळे यात फरक उरणार नाही!
मला वाटते की एखाद्याचा दर्जा खालावला की त्याला नवे पर्याय उपलब्ध असतात. सुजाण वाचकांनी/ प्रेक्षकांनी आणि याबरोबरच संचालकांनी आपला दर्जा चांगला कसा राखावा हे भान ठेवायला हवे. अशा संकेतस्थळांचे चालक या गोष्टींकडे आपली नजर वळवतील तर ते त्यांच्या फायद्याचेच ठरेल.
लेख थोडा विस्कळीत वाटला, पण आवडला. आधी म्हटल्याप्रमाणे शेवटचे दोन परिच्छेद अधिक आवडले. कदाचित एक अनुदिनीकार, महाजालपडीक आणि मनोगतासारख्या मराठी संकेतस्थळाचे वाचक असल्याने.