सदस्य मनोगतावर आपले लेखन लिहितानाच नव्हे, तर आपल्या अनुदिनीवर,
संकेतस्थळावर, व्यक्तिगत पत्रव्यवहारासाठी, नियतकालिकांमध्ये अशा
निरनिराळ्या संदर्भात लिहिताना मनोगताच्या लेखन/संपादन/शुद्धिचिकित्सा
सुविधांचा आत्मविश्वासाने आणि भरवशाने वापर करताना दिसतात.
यासाठीच या सुविधेचा API प्रसिद्ध करणे गरजेचे आहे. या बाबतीत प्रशासकांनी आपले दीर्घकालीन धोरण जाहीर करणे गरजेचे आहे. विदागारावर पडणारा अतिरिक्त ताण आणि इतर ठिकाणचे लेखन इथून करण्याला दिलेला हिरवा कंदील याचा मेळ बसणे गरजेचे आहे.
विशाल मोनपरा यांनी केलेला एक प्रयत्न उदाहरण म्हणून येथे पाहता येईल. इतर संकेतस्थळांना अशी सुविधा मोफत अथवा काही शुल्क भरून परस्पर वापरता येईल असे काही करण्याचा बेत आहे का?