ओंकार जोशी यांनी पुढाकार घेऊन गमभन-शुद्धिचिकित्सा प्रकल्प हा मनोगतावरील शुद्धिचिकित्सकासारखेच काम करणारा मुक्त प्रकल्प (http://www.saraswaticlasses.net/shabdasampada/ ) सुरु केला आहे. मात्र ओंकारसारख्या प्रतिभावंत प्रोग्रामरला त्याचे प्रयत्न आधीच उपलब्ध असणाऱ्या सुविधेसाठी घालवावे लागणे खेदकारक आहे. केवळ मनोगताचे सदस्यच नव्हेत तर मराठी टंकन करण्याची इच्छा असणाऱ्या अ-मनोगतींनाही ही सुविधा सहजपणे उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे असे वाटते.
मनोगत ज्या प्रणालीवर आधारित आहे त्या द्रुपल सीएमएसनेही जीपीएलचा पुरस्कार केला आहे. शुद्धिचिकित्सकाचा द्रुपलशी संबंध नसला तरी शुद्धिचिकित्सकाची प्रणाली वितरित करणे शुद्ध मराठी टंकनाच्या प्रसारासाठी उपयोगी ठरावे.