सात हा अंक हनुमान देवतेला विशेष प्रिय आहे. हनुमान पूजा सात शनिवारी सात प्रकारच्या धान्यांनी करावयाची असते.
औषध आजारावर लागू होते की नाही हे पाहण्यास कमीत कमी सात दिवसांचा अवधी लागतो असे आयुर्वेदात सांगितले आहे.
इस्लाममध्ये सात स्वर्ग आणि सात पृथ्वी असल्याचे मानतात.
सहा दिवसात परमेश्वराने सर्व सृष्टी निर्माण केली आणि सातव्या दिवशी विश्रांती घेतली म्हणून सात ही संख्या पूर्णत्वाचे प्रतीक आहे असे ख्रिस्ती धर्मात मानले आहे.
एखाद्या पुराणाचे पारायण करावयाचे असल्यास त्याची समाप्ती सातव्या दिवशी करावयाची असते.
शिवराज्याभिषेक विधी सातव्या दिवशी पूर्ण करण्यात आला.
सात ही व्यापक संख्या आहे असा संकेत ऋग्वेदाइतका प्राचीन आहे.
वैशाली सामंत.