आणि १,३ किंवा ४ ही नाही. पण सुटका तर निश्चित आहे. कसे ते सांगतो -

याला १ नव्हे तर २ कैद्यांची गरज आहे.

कैदी क्र. १ - याला जर समोर २ आणि ३ च्या डोक्यांवर दोन्ही काळ्या टोप्या दिसल्या तर त्याच्या डोक्यावर पांढरी टोपी आहे. याउलट जर समोर २ आणि ३ च्या डोक्यांवर दोन्ही पांढऱ्या टोप्या दिसल्या तर त्याच्या डोक्यावर काळी टोपी आहे.
त्याप्रमाणे तो ओरडेल. पण तसे नसेल तर...? म्हणजे एक काळी आणि एक पांढरी टोपी असेल तर?

पण कैदी क्र. २ हाच इथे उपयोगी पडेल. त्याला समजेल की ज्याअर्थी कैदी क्र. १ बराच वेळ काही ओरडला नाही त्याअर्थी आपल्या आणि कैदी क्र. ३ च्या डोक्यावर एक काळी आणि एक पांढरी टोपी आहे.
त्याला कैदी क्र. ३ ची टोपी दिसत आहे. त्यामुळे त्या टोपीच्या रंगाच्या विरुद्ध रंग तो मोठ्याने सांगेल आणि सर्वांची सुटका होईल.

बरोबर? आपल्या डोक्यावरील टोपीचा रंग कुठल्या क्रमांकाचा कैदी अगोदर ओळखेल आणि का ? हे थोडेसे दिशाभूल करण्यासाठी असावे...