तिसऱ्या आणि चौथ्याजवळ माहितीच कमी असल्याने ते काही निष्कर्ष काढू शकणार नाहीत.
पहिल्या चोराला दुसऱ्या व तिसऱ्या चोराची टोपी दिसत आहे. तरीही त्यावरून तो स्वतःच्या टोपीबद्दल निश्चित काही सांगू शकणार नाही कारण ती काळी किंवा पांढरी - कोणतीही असू शकेल. त्यामुळे तोही काही बोलणार नाही.
दुसऱ्या व तिसऱ्याच्या टोप्या एकाच रंगाच्या असत्या तर पहिल्याला स्वतःच्या टोपीचा रंग ओळखता आला असता. पण तो ते करू शकत नाही पाहून दुसऱ्यास कळेल की त्याच्या स्वतःच्या टोपीचा रंग तिसऱ्याच्या टोपीपेक्षा वेगळा म्हणजेच पांढरा आहे.