>>मनोगत वर लेख, कविता तारांकीत करण्याची व्यवस्था केल्यास कवितेची लोकप्रियता कळू शकेल.<<
लोकप्रियता हा काही दर्जाचा निकष असू शकत नाही. ज्याचे उदाहरण तुम्हीच दिले आहेत.
निदान सुरेश भटांसारख्या मोठ्या कवीच्या तोंडून आल्यामुळे का होईना चंगो प्रकरण ही नुसती शब्दांची कसरत किंवा गिरणी आहे ह्याचे भान काही लोकांना तरी आले असेलच ना.
व्यक्तिसापेक्षता कितीही मानायची ठरवली तरी दर्जा अशी एक काही वस्तू उरतेच, असतेच. त्याचे मूळ निकष असे ठरवता येणं अवघड असलं तरी अशक्य नसावं. आपण आपल्या परीने प्रयत्न करू या का?
माझे दोन पैसे म्हणजे... काव्य खरं/ प्रामाणिक असलं पाहिजे. आता मी अमुक अमुक विषयावर कविता करून दाखवतो हं असं नाही. एखादा चांगला वा वाईट अनुभव, एखादी भावना, बोच व्यक्त व्हायला भाग पाडते कधी ते कवितेतून तर कधी चित्रातून, कधी कथेतून, लेखातून इत्यादी इत्यादी... हे भाग पाडणं महत्त्वाचं ते घडतं तेव्हाच कविता खरी असते नाहीतर बाकीचा शब्दखेळ. अनुभव म्हणजे फक्त प्रत्येक प्रकारच्या प्रसंगातून जायलाच हवे असं नाही. परत हा प्रांत खूप धूसर आहे. आणि त्याबद्दल आत्ता बोलू शकेन असं वाटत नाहीये. नंतर.
ज्यांना इथल्या कवितेच्या दर्जाबद्दल खरंच आस्था आहे त्यांनी सगळ्यांनीच आपापल्या परीने दर्जाचे निकष शोधायचा प्रयत्न करूया!!