आता अद्वैत आणि नेहा यांच्यातील संबंधाला कारणीभूत 'वासना' आहे की 'प्रेम' हे बघण्याच्या भानगडीत मी पडणार नाही. अशा 'आयटी' कथा आसपास घडतात हे खरे. एकंदरच पुरुषांसाठी स्त्रियांची उपलब्धता वाढली आहे. आणि स्त्रियांसाठीही. त्यामुळे आता प्रमाणही वाढले आहे.
असो. एकंदर लिखाण छान असले तरी एकंदर भावविव्हल साबणी संवाद आणि शैली इत्यादी टाळता असते तर आवडले असते.
उदा.
’बस्स. सांगितलंय मला सासूबाईंनी, तुझ्या आत फुललेल्या आनंदाच्या झाडाबद्दल.’
तिचं पाऊल दाराबाहेर पडत असताना त्याचे शब्द आले,’थांब राणी, थांब.’
भगिरथ प्रयत्नांनी ती उठली. डोळ्यांतून वाहू पाहणाऱ्या हतबलतेच्या अश्रूंना तिनं निग्रहानं थोपवलं.
एकंदर वाक्ये विशेषणे न वापरता लिहून बघावीत. ह्याशिवाय, काही ठिकाणी जी लेक्चरबाजी झाली आहे, तीदेखील टाळता आली असती तर आवडले असते. कथा अधिक घोटीव झाली असती. असो. पुढच्या लेखनाला शुभेच्छा.