महिपत हा नकी कोण होता, हे अजूनही उलगडलेले नाही मला. त्याचा पोप्या शी किवा त्याच्या मित्रांशी काय संबंध हे ही स्पष्ट केलेले नाही.
कथेतील व्यक्तिरेखा विस्कळीत वाटतात. कथा वाचताना पात्रे डोळ्यासमोर उभी रहात नाहीत. अर्थात हा माझा वैयक्तिक अनुभव असू शकेल. पण त्यामुळे कथेतला एकसंधपणा हरवल्यागत वाटतो.
डरना मना है मधल्या शेवटच्या कथेत अश्याच प्रकारची एक कथा आहे. त्यात हळू हळू करून एक एक व्यक्ती गायब होउ लागते. शेवटी सर्व जण एकमेकांना दिसतात. तेव्हा त्याना पत्ता लागतो, की आपण सर्व जण कधीच मरण पावलेलो आहोत. तसे काहीतरी आहे का या कथेमध्ये?