यथामति शंकानिरसन: शंका रास्त आहे; पण लेखन पीडीएफमध्ये मागवण्यामागं फाँटचा प्रश्न येऊ नये, हा हेतू. त्याची मुद्रित प्रत घेऊन, वाचून मगच संपादन होईल. त्यावेळी आवश्यकता भासल्यास बदल करावे लागतील. पीडीएफमध्ये आलेला मजकूर दिवाळीअंकात तसाच घेता येईल असे नाहीच. या अंकाची जी रचना ठरेल, त्यात तो उतरवावा लागेल. हे थोडे क्लीष्ट वाटेल, कारण ते तसे आहेही.