हा "वाद" रंगविल्याबद्दल धन्य"वाद"! अर्थात, संवाद साधणे महत्त्वाचे, पण तरीही, शब्दकोशाने ह्यावर काहीतरी उपाय काढावा, आणि भाषेतल्या इतर नियमांप्रमाणे "तो" सगळ्यांनी पाळावा असे वाटते. (उपाय हा शब्द पुल्लिंगी आहे ह्याबद्दल तरी दुमत नसावे!)

माझ्या अनेक मैत्रिणींच्या सुखी संसारात ह्या "लिंगभेदामुळे" कलह निर्माण झालेले आहेत, हे मी पाहते आहे. एकीने तर आपल्या मुलीला "तो" आणि "ती" ब्रेड चा वाद नको म्हणून "ते ब्रेड" शिकवलंय!  म्हणजे आपल्या पोरांची मराठी आपल्यापेक्षा खूप पुढे जाणार निश्चित!

जर्मन शब्दांशी केलेली तुलना आवडली. तिथेही "introduction, communication" असे अंती "tion" असणारे शब्द स्रीलिंगी असावे असा नवीन नियम केलेला आहे. अजून काही सम-लिंगी जर्मन शब्द: "फोन आला" = der Anruf, ती बशी = die Untertasse, ती क्रिया= die Aktion असो, meine Liebe" म्हटलं की खरंच "प्रिये!" म्हटल्यासारखं वाटतं की नाही! तसेच, जर्मन मधे जोडशब्द तयार करायची पद्धत आहे, ती ही मराठीत वापरायला हरकत नाही (उदा: शितस्वाशे!) गंमत बाजूला ठेवू, मात्र खरच "वेळापत्रक", "पादचारी मार्ग" असे अजून जोडशब्द करायला हवेत.