ही कविता मी माझ्या जिवलग मित्राला उद्देशून लिहिली आहे. मी college मधे असताना एक लहान मुलगा मला भेटला. सदैव तो माझ्या बरोबर असायचा. प्रथंम मलाही थोडे विचित्र वाटले. पण नंतर माझाही जीव त्याच्यात गुंतत गेला. त्याला काय हवे, नको, त्याची प्रत्येक इच्छा, गरज याची मीच काळजी घेऊ लागलो. स्वत:जवळच्या थोड्याश्या पैश्यातना त्याचे मी लाड पुरवायला लागलो. माझ पाखरू मोठ झाल आणि दूर आकाशात उडून गेले. जसे अचानक आले तसेच........ आजही माझा मित्र माझा जिवलग आहे. जगातल्या सर्वांपेक्षा सर्वात जास्त प्रेम त्याच माझ्यावर आहे...... पण तरीही आम्ही दूर आहोत, केवळ दैवाने....