छान झाली!

माहितीचा अधिकार अर्ज कसा लिहायचा ? अर्जाच्या "टेंप्लेट" आपण मनोगत च्या माध्यमातुन द्यावी काय ?

हा अर्ज खुप सोपा आहे लिहिणं. अर्ज करतांना फक्त १० रु. खर्च येतो. आणि माहिती पत्रकातल्या प्रत्येक पानासाठी २ रु.  इथे 'attachments' कश्या पाठवायच्या? माझ्याकडचा अर्जाचा नमुना मी पाठवू  इच्छितो.

माहिती कशी विचारयची या संबंधि चर्चा व्हायला हवी आहे.

आपले प्रश्न सुस्पष्ट, कमीतकमी शब्दात विचारावेत हे अपेक्षित आहे. एका विषयाशी निगडित सगळे प्रश्न एका अर्जात असावेत. वेगवेगळ्या विषयांचे प्रश्न एका अर्जात असू नयेत. (उदा. राज्य परिवहन मंडळाचे प्रश्न आणि राज्य महिला व बालविकास मंडळाचे प्रश्न वेगवेगळ्या अर्जात असावेत.)

ही चर्चा या निमिताने व्हावी. आपल्याला काय वाटते.?

मी म्हणेन की चर्चा आवश्यक आहेच. सगळ्या अडचणी आणि प्रश्न चर्चांद्वारे दूर करावेत, पण लवकर! कारण कृतीत आणायला वेळ लागता कामा नये. तसंही हे काम संघटित वगैरे होऊन करण्याची आवश्यकता नाही आहे.

कोण कसे यशस्वी होतात हे सुद्धा पहाण्या सारखे आहे.

१. लुल्ला नगर (पुणे) येथील एका गृह संस्थेमध्ये कचऱ्याच्या पेट्या नव्हत्या आणि कचरा न्यायलादेखील कोणी यायचे नाही. मागील महिन्यात यासाठी एक माहिती मागणारी याचिका दाखल करण्यात आली. '१२ पेट्या अपेक्षित आहेत' आणि ' म. न. पा. तर्फे रोज कचरा गोळा करणे आवश्यक आहे' असे उत्तर आले. ३ ऱ्या दिवशी ही सगळी व्यवस्थाही करण्यात आली.

२. शिधा पत्र मिळत नसणाऱ्या एका माणसाने, शिधा पत्र मिळायला किती दिवस लागतात, ही माहिती  मागवली. माहिती मिळाल्यावर, त्या आधारे त्याने, स्वतःच्या शिधा पत्रासाठी चौकशी केली. या सगळ्या प्रकरणात झालेल्या उशीराबद्दल माफी मागून त्याला शिधा पत्र देण्यात आले.

या आणि अशा अनेक यशस्वी कथा आहेत, पण उपयोग करणारी माणसं कमी आहेत. आपण सगळ्यांनीच थोडे आग्रही राहून यात सहभाग घ्यायला हवा.

अमितराज