लेख आवडला.
(म्हणजे सुश्री जयललितांच्या चप्पलजोड्या आमच्या गावातील सगळ्या स्त्रियानी चप्पल वापरण्याचे ठरवले असते तर त्याना जन्मभर पुरल्या असत्या.)
थोडक्यात दुसऱ्या दिवसापासून माझा कार्यभार तिच्यावर सोपवून फक्त आता चुनिलालचे कसे होणार एवढी काळजी सोडता मी निश्चिंत झालो.
गिऱ्हाइकासाठी नसली तरी तो स्वत: पुरती तरी गाळत असावा याची मला खात्री पटली.
अशा वाक्यांनी लेख खुसखुशीत झाला आहे.
आरामखुर्चीबद्दल लिहिलेले 'तंतोतंत' बरोबर आहे. ही आरामखुर्ची खरेच खूप आरामशीर असायची. अशा खुर्चीत बसून/पहुडून वाचणे आणि वाचता वाचता झोपी जाणे यासारखे सुख नाही. शिवाय तो दांडा काढून ठेवणे आणि नंतर मजा बघणे हा व्रात्य मुलांचा आवडीचा खेळ असे. मजा 'कोणाची' होते यावर मुलांना मार द्यायचा की त्यांच्या हास्याच्या उकळ्यांमध्ये सामील व्हायचे हे अवलंबून असायचे!